Panjab dakh live या तारखेपासून पाऊस विश्रांती घेणार पंजाब डख.
Panjab dakh live : शेतकरी मित्रांना नमस्कार राज्यातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे पंजाबराव डख यांनी आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते रिमझिम पावसाचा अंदाज त्यांनी दिला आहे. तरी राज्यातील पाऊस विश्रांती कधी घेणार आपण पुढील प्रमाणे सविस्तर माहिती पाहूया..
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार उद्या म्हणजेच 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे.. मात्र विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस सुरू राहील असा अंदाज आलाय..
4 ते 7 सप्टेंबर या काळामध्ये पावसाचा पुन्हा महाराष्ट्रात कमबॅक होणार असल्याचाही अंदाज त्यांनी दिलाय . मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील सर्व जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे..
राज्यात 31/ऑगस्ट ते 3/सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे कामे पूर्ण करून घ्यावेत असंही पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. कारण राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा तडाका बसणार आहे.